GDP – विकासाचा हिशोब - भाग २ [२७ ऑक्टोबर २०१९]
(हा लेख आणि आधीचा पहिला भाग तसेच माझे वित्तंबातमी सदरातले इतर लेख महाराष्ट्र मंडळ बेंगळूरुच्या सनविवि मासिकात प्रथम प्रसिद्ध झाले. हे मासिक आणि मंडळाच्या उपक्रमांविषयी इतर माहिती फेसबुकवर @MMBlr .org ये थे उपलब्ध आहे. जरुर वाचा) कसे मोजायचे जीडीपी ? आपली उंची किंवा वजन मोजणे सोपे असते. एखाद्याकडे किती पैसे आहेत ते मोजणेही कठीण नाही. तुमच्या डोक्यावर किती केस आहेत तेही एकवेळ मोजता येईल आणि तो अंदाज गणित , आणि आधुनिक यंत्रांच्या साहाय्याने बर्यापैकी अचूक असेल. एका चौरस सेंटीमीटरमधले केस मोजा आणि तुमच्या डोक्याच्या क्षेत्रफळाने गुणा (जिथे टक्कल पडले असेल तो भाग वगळून). पण एका देशात नक्की किती माणसे आणि उद्योग-व्यवसाय राहतात आणि ते चरितार्थासाठी काय काय आर्थिक उपद्व्याप करतात हे ‘ कबन पार्कात गेल्या रविवारी किती बरे षटपाद किडे होते ’ ते ओळखण्याएवढे अवघड काम आहे. आता त्या तेवढ्या माणसांचे उत्पन्न गेल्या तिमाहीत कितीने वाढले ते सांगा असे कोणी विचारले तर त्या षटपाद किड्यांनी एका दिवसात एकूण किती किलो अन्न फस्त केले हे सांगावे लागण्यासारखे आहे. अ...