वित्तंबातमी: बेझॉस, गोयल आणि महंमदाचे पामतेल [२६ जानेवारी २०२०]
वित्तंबातमी पहिली पैसे आणता म्हणजे काही उपकार नाही करत! आपल्या रेल्वे आणि वाणिज्य मंत्र्यांच्या अशा विधानाने नुकतीच बरीच खळबळ माजली. जगातील अतिश्रीमंतांपैकी एक असलेले, अमेझॉन कंपनीचे चालक-मालक, जेफ बेझॉस नुकतेच भारताचा दौरा करुन गेले. मोदी जॅकेट (नेहरु जॅकेट म्हणा हवं तर) घालून, आपल्या प्रेयसीच्या हातात हात अडकवत, कधी पतंग उडवीत तर कधी शाहरुख खान बरोबर शेकोटीशी गप्पा (fireside chat) मारत, कधी दिल्लीच्या स्टेडियममध्ये भरवलेल्या मोठ्या जत्रेत अमेझॉनवर विक्री करणाऱ्या छोट्या मोठ्या विक्रेत्यांना भरघोस धन्यवाद देता देता बेझॉस असेही म्हणून गेले की त्यांची कंपनी येत्या काही वर्षात भारतात १०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक करायचे बेत आखत आहे. आता तुम्ही म्हणाल ही तर चांगली बातमी आहे. जगभरची सरकारे त्यांच्या त्यांच्या देशात विदेशी गुंतवणूक यावी म्हणून आकाश पाताळ एक करत असताना पियुष गोयल यांनी असे कुत्सित विधान का बरे करावे? तर याचे कारण हे आहे की भारतात लोकशाही आहे. आणि कुणी काहीही म्हणो, पण आश्चर्यकारक रीत्या ती, भल्या बुऱ्या प्रकारे काम बजावत ...