Posts

Showing posts from January, 2020

सरकारचे (नसते) धंदे [२९ नोव्हेंबर २०१९]

आपण हा लेख इथे ऐकू शकता आपण एक मोठा उद्योगपती ,  कारखानदार असावं असं स्वप्न तुम्ही कधी बघितलंय का हो ?  नसेल तरी निराश होऊ नका. असेल तरी हुरळून जाऊ नका. कारण तुमच्या स्वप्न बघण्या न बघण्याने काहीच फरक पडत नाही. तुम्ही  ( आणि आम्हीसुद्धा) जन्मत:च बडी असामी आहोत. मी तुम्हाला हरभर्‍याचा झाडावर चढवायला बघत नाहीये. केवळ भारतीय नागरिक असण्यामुळे तुम्हाला हे भाग्य लाभलं आहे. विमानप्रवास बोकाळायच्या आधी तुम्ही आम्ही झुकझुक गाडीने जायचो ते दिवस आठवा. डब्याच्या दाराजवळ आग लागू नये म्हणून प्रतिबंधित वस्तूंची यादी असायची आणि तिथेच कुठेतरी  “ यह रेल भारतीय जनता की संपत्ती है” असं वाक्य असायचं. रेल्वेच नाही तर भारतीय सरकारचे असे कितीतरी उद्योगधंदे आहेत जे आपल्याला अप्रत्यक्षरीत्या का होईना टाटा-बिर्ला-अंबानी-अदाणी असण्याचं फीलिंग देतात. भारी ना ?  बोला...भारत माता की....जय! भारत सरकारच्या अर्थमंत्रालयाचा एक अख्खा विभागच आहे – निवेश और लोक परिसंपत्ति प्रबंधन विभाग. म्हणजे  Department   of   Investment   and   public   asset   manageme...