दुष्कर प्राप्तिकर [२ जुलै २०१९]
बजेट म्हटलं की तुमच्या मनात काय येतं ? इन्कम टॅक्स वाढणार की कमी होणार , कर दरवाढीमुळे गोष्टी महागणार की स्वस्त होणार , शेअर बाजारात रस घेणार्यांपैकी तुम्ही असाल तर बजेटमुळे मार्केट वर जाईल की खाली एवढ्याच तुरळक बाबी तुमच्या मनात डोकावत असतील तर वाईट वाटून घेऊ नका. तुम्ही नॉर्मल आहात. म्हणूनच तुमच्यासारख्या नॉर्मल वाचकांसाठी ह्या लेखात आपण तुमच्या जिव्हाळ्याच्या विषयावरच लक्ष केन्द्रित करुया:- आयकर किंवा प्राप्तिकर! तुम्ही चाकरमाने असाल तर मासिक TDS च्या रुपाने जो तुमच्या पगाराला कात्री लावतो , तुम्ही व्यावसायिक / धंदेवाईक असामी असाल तर त्रैमासिक advance tax च्या अवतारात जो तुमच्याकडून वसुली करतो तो प्राप्तिकर! तुम्ही एखादी मालमत्ता विकून झालेल्या नफ्यावर देता तो भांडवली फायद्यावरचा कर , किंवा अगदी पेन्शनर असाल आणि फक्त बँकेकडून ठेवींवर व्याज मिळवत असाल तरी तुम्हाला लागू होणारा , भाड्याने दिलेल्या घरातून मिळणार्या उत्पन्नावरही बसणारा असा तो एकमेवाद्वितीय प्राप्तिकर. एक शेतकरी तेवढे सोडले तर तुम्हाला , कंपन्...